Saturday, 17 June 2017

विभागाचे नाव : अभियांत्रिकी (वर्कशॉप) प्रकल्प (Project)- भिंत बांधणे (क्लासरूम शेजारी)

विज्ञान आश्रम, पाबळ.

विभागाचे नाव
:
अभियांत्रिकी (वर्कशॉप)
प्रकल्पाचे नाव
:
भिंत बांधणे (क्लासरूम शेजारी)
विद्यार्थ्याचे नाव
:
अर्चना संदीप मोरे
मार्गदर्शन
:
जाधव सर, विश्वास सर
प्रकल्प सुरु केल्याची दिनांक :-
:
११.०५.२०१७
प्रकल्प संपण्याची दिनांक
:
१५.०५.२०१७





अनुक्रमणिका

अ.क्र.
शिर्षक
पान.क्र.
१.
प्रस्तावना
२.
उद्देश व नियोजन
३.
साहित्य व साधने
४.
डिजाईन
५.
कृती
७ व ८
६.
भिंत तयार करणेसाठी आलेला प्रत्यक्ष खर्च
९  
७.
अनुभव व निरीक्षणे
१०
८.
छायाचित्रे
११ व १२


प्रस्तावना :-

विज्ञान आश्रमातील नवीन क्लासरूमच्या समोरील जागेचे सपाटीकरण करून बाग सुशोभीकरणासाठी व कंपाउंडसाठी भिंत बांधणे आणि बांधकाम (construction) कामाचा अनुभव घेणे. या उद्देशाने सर्व साहित्य व साधने यांचे नियोजन करून अभियांत्रिकी विभागातील मुलांच्या मदतीने, जाधव सर व विश्वास सर यांच्या मार्गदर्शनाखाली भिंत बांधली.

उद्देश व नियोजन :

उद्देश :

विज्ञान आश्रमातील नवीन क्लासरूमच्या समोर बाग सुशोभीकरणासाठी व कंपाउंडसाठी भिंत बांधणे आणि बांधकाम (construction) कामाचा अनुभव घेणे.
नियोजन :-

सुरवातीला भिंत बांधावयाच्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घेतली. आश्रमामध्येच सर्व साहित्य व साधने उपलब्ध असल्याने लगेच एकत्रित करता आले. बांधकाम कोणत्या bond मध्ये करावयाचे व भिंतीची उंची किती असावी हे ठरवून निश्चित केले. भिंतीचे गुगल स्केचप या सॉफ्टवेअर मध्ये डिजाईन करून घेतले.

साहित्य :

अ.क्र.
साहित्याचे नांव
1.
सिमेंट
2.
वाळू
3.
मोठी खडी
4.
लहान खडी (कच)
5.
विटा
6.
पाणी




साधने :

अ.क्र.
साधने नांव
 1.
ओळंबा
2.
लेवल ट्यूब
3.
खोरे
4.
घमेली
5.
थापी
6.
मेजारिंग टेप
7.
बकेट
8.
गुण्या
9.
हॅण्डग्लोज
























डिजाईन :


कृती :- 

सुरवातीला भिंत बांधावयाच्या जागेवरील दगड व विटांचे तुकडे बाजूला काढून जागा स्वच्छ करून घेतली. पाया खोदण्यासाठी लेव्हल ट्युबने जागेचे मापन करून घेतले.



एक फुट पाया खोदून बांधकामास सुरवात केली. पाया खोदल्यानंतर सुरवातीला खडी कच, व सिमेंट यांचे मिश्रण (१२:३:१) टाकले. हेडर bond (नऊ इंच) मध्ये विटांचे बांधकाम सुरु केले. बांधकामासाठी माल सिमेंट व वाळू १:६ (मॉर्टर) या प्रमाणात वापरले. संपूर्ण भिंत लांबी २१.५ फूट, उंची ४ फूट व रुंदी ४ इंच बांधकाम केले. बांधकाम करीत असताना भिंत योग्य आकारात येणेसाठी वेळोवेळी लेवल ट्यूब, गुण्या (Right Angle) ओळंबा यांचा वापर केला. आठ दिवस सकाळी व सायंकाळी भिंतीवर पाणी मारले.


भिंत तयार करणेसाठी आलेला प्रत्यक्ष खर्च :

अ.क्र.
साहित्याचे नांव
एकूण वापरलेले साहित्य नग/घमेली
दर
एकूण किमत
1
वाळू
84 घमेली
20 रु. 1 घमेले
1680
2
सिमेंट
2.5 पोती
350
875
3
मोठी खडी
12 घमेली
10 रु. 1 घमेले
120
4
लहान खडी (कच)
3 घमेली
10 रु. 1 घमेले
30
5
विटा
455 नग
7
3185
6
एकूण


5890
7
मजुरी 15%


884
8
एकूण खर्च


6774

अनुभव व निरीक्षणे :

  • 1.    अनुभवी मुलांच्या मदतीने भिंत अगदी बरोबर झाली.
  • 2.    सिमेंट व वाळू यांचे प्रमाण बरोबर वापरल्यास माल (मिश्रण) चांगले होत होते.
  • 3.    लेवल ट्यूब, गुण्या, व ओळंबा या बांधकामातील महत्वाच्या मापन पद्धतीं वापरल्याने अधिक माहिती मिळाली व अनुभव वाढला.
  • 4.    बांधकामातील विविध bonds ची माहिती मिळाली.

छायाचित्रे :


















No comments:

Post a Comment