साहित्य : - मिरची 1 किलो, हळद 10 चमचे, मोहरी
10 चमचे, ओवा 10 चमचे, आमचूर पावडर 10 चमचे, हिंग 2 चमचे, बडीशेप 5 चमचे (लहान
चमचे), तेल 20 चमचे (पळी), मीठ 50 ग्रॅम.
कृती : - मिरची धुवून सुती रुमालनी पुसून घेतली.
मधून कापून घेतली. त्यानतंर हळद, हिंग,
मीठ (थोडेसे) टाकून हलवले. मंद गॅसवर मोहरी, ओवा, बडीशेप हे सर्व भाजून घेवून
मिक्सरला वाटून घेतले. (जाडसर) तेल गरम करून त्यामध्ये हळद, हिंग, वाटलेला मसाला टाकला.
हे मिश्रण थंड झाल्यावर मिरचीवर ओतून शिल्लक राहिलेले मीठ टाकून हलवून घेतले.
बरणीत भरून दोन दिवस उन्हात ठेवले. (उन्हात ठेवल्यामुळे तापमान एकसारखे लागते व
लोणचे लवकर तयार होते.)
No comments:
Post a Comment