Thursday 8 September 2016

विभाग : शेती –पशुपालन प्रात्यक्षिक :हायड्रोपोनिक्स ( माती विना हिरवा चारा )


महत्व :-हिरवा  चारा याचे उत्पाद्न कमी दिवसामध्ये व कमी जागेत व कमी पाण्यात होऊ शेकते. तसेच दुष्काळ भागात व उन्हाळीमध्ये हिरवा चारा होतो. हायड्रोपोनिक्स मुळे जनावरांच्यावर येणारा खर्च कमी होतो. जनावरांच्या  रोजच्या दुधात वाढ होऊ शेकते.  
तयार करण्याची पद्धती :-प्लास्टिक ट्रे असावेत. पहिला मका नीट करून घ्यावा  मीठाच्या पाण्यामघ्ये १० मिनिट भिजत ठेवून नंतर चांगल्या पाण्यात मका १२ तास भिजत  ठेवावा. दोन दिवसांनी मोड आलेले असतात. त्यावेळी ट्रे स्वच्छ धुवून घ्यावेत. ५०० ते ७०० ग्रॅम मका  वजन करून ट्रे मध्ये घालावा. त्यानंतर बरोबर ठिबक सिंचनच्या खाली ट्रे ठेवावेत.            
चारा तयार होण्याचा कालावधी :- १५ ते २० दिवसात चारा जनावरांना देऊ शकतो. २ ते ३ ट्रे जनावरांना रोज मिळाले पाहिजेत. त्यामुळे जनावरांच्या दुधात वाढ होते.अर्धा ते दोन लिटर मध्ये तसेच दुधामध्ये फॅट चांगला  बसतो .




 




विभाग शेती आणि पशुपालन प्रात्यक्षिक : गादी वाफा [ मिरची रोपासाठी ]



शेतातील गवत, दगड, कचरा काढून जमीन स्वच्छ करून घेतली. जमीन नांगरून भुसभुशीत केली. त्यामध्ये कंपोस्टखत ४० किलो, एम. ओ. पी. दीड किलो, युरिया साडेचार किलो, व एस. एस. पी. १० किलो खत टाकले. पुन्हा जमीन नांगरून घेतली. मीटरटेपने माप घेऊन फावड्याच्या सहाय्याने उंचावर गादीवाफा बनवला. वाफावर इनलाईन पद्धतीने पाण्याची पाईप जोडली. त्यावर मल्चिंगपेपर घातला ग्लासच्या सहाय्याने होल पाडून घेतले. मिरचीचे रोपे लावलीत.


विभाग शेती आणि पशुपालन प्रात्यक्षिक : अॅझोला बेड तयार करणे.



अॅझोला बेड तयार करत असताना घेतलेले साहित्य अॅझोला, पाणी, शेण, माती, विटा, टरपोलीन पेपर, एस. एस. पी, युरिया, इ.
अॅझोला बेड बनवत असताना घेतलेली साधने फावडा, बकेट, घमेल, पाईप इ.
सुरवातीला अॅझोलाचे बेड तयार करण्यासाठी खड्डे काढले. टरपोलीन पेपर घातला. बाजूनी विटा लावल्या टरपोलीन पेपरवर चाळून घेतलेली माती पसरून घेतली. शेण, एस. एस. पी. पाण्यात मिक्स करून खडडयात ओतले .
पूर्ण खड्डा पाण्याने भरून घेतला. त्यानंतर खड्या मध्ये अझोला सोडला.
उत्पादन :  1 meter बाय 1 meter  मधून  २०० gm. मिळतो.
उपयोग : अझोला मधून जनावरांना पोषक अन्नघटक मिळतात. या मध्ये प्रोटीन मिळतात.   अझोला भात शेतीस उपयुक्त आहे. जनावरांच्या दुधात वाढ होते.


विभाग शेती आणि पशुपालन प्रात्यक्षिक : माती परीक्षण



आम्ही शेत नांगरणीपूर्वी मातीचा नमुना व्ही आकारामध्ये घेतला. मातीचा नमुना दहा ते पंधरा ठिकाणांची माती घेतली. माती काढण्यासाठी फावड्याचा वापर केला. ती माती घमेलात एकत्रित मिक्स केली. एक दिवस सावलीत वाळवण्यासाठी ठेवली. माती गोलाकारामध्ये पसरून त्याचे समान चार भाग करून घेतले. व समोरच्या दोन भागातील माती बाजूला काढली. जो पर्यंत अर्धा किलो माती शिल्लक राहत नाही. तो पर्यंत मातीचे भाग केलेत. माती परिक्षणसाठी माती चाळून घ्यावी. मातीचे परिक्षण करण्यासाठी माती परिक्षण संचचा वापर केला.
मातीचे नमुने कोणत्या ठिकाणांची घेवू नये : -
१) कचरा टाकण्याची जागा.
२) दलदलीची जागा.
३) गुरे बसण्याची जागा व झाडाखालची जागा.
४) पाण्याखालील जागा. 




विभाग गृह आणि आरोग्य प्रात्यक्षिक : चिक्की बनवणे



साहित्य :- शेंगदाणे(२५०), साखर किंवा गुळ(२५०  ), तूप(1/२ चमचा), पाणी (२ चमचे )  
साधने :- पक्कड, कढई, उ़लथणे, सुरी, गॅस, पाठ, लाटन, इ.    
कृती :- शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाण्यावरील टलफले काढून पाकळ्या केल्या. गुळाचा पाक तयार
      केला. पाक तयार झाला आहे कि नाही ते पाहण्यासाठी वाटीत थोडे पाणी घेवून त्यात गुळाचा        
पाक थोडासा टाकून त्यामध्ये पाकची गोळी तयार झाली असेल तर आपला पाक तयार झाला.                 
पाकामध्ये शेगदाणे घालून एक मिनिट हलवून घेतले. व गॅस बंद केला. ते मिश्रण गरम
असतानाच पाठावर घेतले. लाटण्याच्या साह्याने पसरून घेतले. सुरीने कट केले. या पद्धतीने 
आम्ही चिक्की बनवली.

विभाग गृह आणि आरोग्य प्रात्यक्षिक : खारीबुंदी बनवणे.



साहित्य : - बेसनपीठ, सोडा, लालतिखट, मीठ, शेंगदाणे.
साहित्याचे प्रमाण :- बेसनपीठ २ वाटी, सोडा अर्धा चमचा, लालतिखट २ चमचे, शेंगदाणे ३ वाट्या, मीठ चवीनुसार
साधने  : - कढई, झारा, शेगडी.
कृती : - बेसनपीठामध्ये मीठ व सोडा टाकून एकत्र करून घेतले. त्यात  पाणी घालून
                ते सर्व फेटून घेतले. थोडे पीठ पातळ केले. नंतर कढईत  तेल तळण्यासाठी घेतले. तेल कढल्यानंतर  बेसनपीठ झाऱ्यावर टाकून हलकासा झारा हलवून बुंदी सारखी कळी पाडून ती तळून घेतली.
फोडणी : - कढीपत्ता व शेंगदाणे कढईमध्ये एक चमच्या तेल घालून चांगले भाजून घ्यावे. त्यात लालतिखट टाकून एकत्रित हलवावे. नतंर खारीबुंदी घालून हलवून घेतले.  
आमची खारीबुंदी तयार झाली.