लसूण लोणचे
साहित्य :- लसूण 250 ग्रॅम, मेथी 10 ग्रॅम,
बडीशेप 10 ग्रॅम, साखर 50 ग्रॅम, तीळ 3 चमचे, लाल तिखट 1 चमचा, मोहरी 1 चमचा,
(लहान चमचा), तेल 300 मिली
कृती :- लसूण सोलून घेतले. त्यानतंर मेथी,
बडीशेप, तीळ, मोहरी हे सर्व वेगवेगळे भाजून झाल्यावर एकत्र करून जाडसर मिक्सरला
वाटून घेतले. तेल गरम करून थंड झाल्यावर त्यामध्ये वाटलेला मसाला व लसूण टाकून
हलवून घेतले. हे लोणचे काचेच्या बरणीत भरून ठेवल्याने
जास्त दिवस टिकते.
No comments:
Post a Comment