विज्ञान आश्रम, पाबळ.
विभागाचे नाव
|
:
|
अभियांत्रिकी (वर्कशॉप)
|
प्रकल्पाचे नाव
|
:
|
भिंत बांधणे (क्लासरूम
शेजारी)
|
विद्यार्थ्याचे नाव
|
:
|
अर्चना संदीप मोरे
|
मार्गदर्शन
|
:
|
जाधव सर, विश्वास सर
|
प्रकल्प सुरु केल्याची
दिनांक :-
|
:
|
११.०५.२०१७
|
प्रकल्प संपण्याची दिनांक
|
:
|
१५.०५.२०१७
|
अनुक्रमणिका
अ.क्र.
|
शिर्षक
|
पान.क्र.
|
१.
|
प्रस्तावना
|
३
|
२.
|
उद्देश व नियोजन
|
४
|
३.
|
साहित्य व साधने
|
५
|
४.
|
डिजाईन
|
६
|
५.
|
कृती
|
७ व ८
|
६.
|
भिंत तयार करणेसाठी आलेला
प्रत्यक्ष खर्च
|
९
|
७.
|
अनुभव व निरीक्षणे
|
१०
|
८.
|
छायाचित्रे
|
११ व १२
|
प्रस्तावना :-
विज्ञान आश्रमातील नवीन
क्लासरूमच्या समोरील जागेचे सपाटीकरण करून बाग सुशोभीकरणासाठी व कंपाउंडसाठी भिंत
बांधणे आणि बांधकाम (construction) कामाचा अनुभव घेणे. या उद्देशाने सर्व साहित्य व साधने
यांचे नियोजन करून अभियांत्रिकी विभागातील मुलांच्या मदतीने, जाधव सर व विश्वास सर
यांच्या मार्गदर्शनाखाली भिंत बांधली.
उद्देश व नियोजन :
उद्देश :
विज्ञान आश्रमातील नवीन
क्लासरूमच्या समोर बाग सुशोभीकरणासाठी व कंपाउंडसाठी भिंत बांधणे आणि बांधकाम (construction) कामाचा अनुभव घेणे.
नियोजन :-
सुरवातीला भिंत
बांधावयाच्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घेतली. आश्रमामध्येच सर्व साहित्य व साधने
उपलब्ध असल्याने लगेच एकत्रित करता आले. बांधकाम कोणत्या bond मध्ये करावयाचे व
भिंतीची उंची किती असावी हे ठरवून निश्चित केले. भिंतीचे गुगल स्केचप या सॉफ्टवेअर
मध्ये डिजाईन करून घेतले.
साहित्य :
अ.क्र.
|
साहित्याचे नांव
|
1.
|
सिमेंट
|
2.
|
वाळू
|
3.
|
मोठी खडी
|
4.
|
लहान खडी (कच)
|
5.
|
विटा
|
6.
|
पाणी
|
साधने :
अ.क्र.
|
साधने नांव
|
1.
|
ओळंबा
|
2.
|
लेवल ट्यूब
|
3.
|
खोरे
|
4.
|
घमेली
|
5.
|
थापी
|
6.
|
मेजारिंग टेप
|
7.
|
बकेट
|
8.
|
गुण्या
|
9.
|
हॅण्डग्लोज
|
डिजाईन :
कृती :-
सुरवातीला भिंत
बांधावयाच्या जागेवरील दगड व विटांचे तुकडे बाजूला काढून जागा स्वच्छ करून घेतली.
पाया खोदण्यासाठी लेव्हल ट्युबने जागेचे मापन करून घेतले.
एक फुट पाया खोदून
बांधकामास सुरवात केली. पाया खोदल्यानंतर सुरवातीला खडी कच, व सिमेंट यांचे मिश्रण
(१२:३:१) टाकले. हेडर bond (नऊ इंच) मध्ये विटांचे बांधकाम सुरु केले.
बांधकामासाठी माल सिमेंट व वाळू १:६ (मॉर्टर) या प्रमाणात वापरले. संपूर्ण भिंत
लांबी २१.५ फूट, उंची ४ फूट व रुंदी ४ इंच बांधकाम केले. बांधकाम करीत असताना भिंत
योग्य आकारात येणेसाठी वेळोवेळी लेवल ट्यूब, गुण्या (Right Angle) ओळंबा यांचा
वापर केला. आठ दिवस सकाळी व सायंकाळी भिंतीवर पाणी मारले.
भिंत तयार करणेसाठी आलेला प्रत्यक्ष खर्च :
अ.क्र.
|
साहित्याचे नांव
|
एकूण वापरलेले साहित्य नग/घमेली
|
दर
|
एकूण किमत
|
1
|
वाळू
|
84 घमेली
|
20 रु. 1 घमेले
|
1680
|
2
|
सिमेंट
|
2.5 पोती
|
350
|
875
|
3
|
मोठी खडी
|
12 घमेली
|
10 रु. 1 घमेले
|
120
|
4
|
लहान खडी (कच)
|
3 घमेली
|
10 रु. 1 घमेले
|
30
|
5
|
विटा
|
455 नग
|
7
|
3185
|
6
|
एकूण
|
|
|
5890
|
7
|
मजुरी 15%
|
|
|
884
|
8
|
एकूण खर्च
|
|
|
6774
|
अनुभव व निरीक्षणे :
- 1. अनुभवी मुलांच्या मदतीने
भिंत अगदी बरोबर झाली.
- 2. सिमेंट व वाळू यांचे प्रमाण
बरोबर वापरल्यास माल (मिश्रण) चांगले होत होते.
- 3. लेवल ट्यूब, गुण्या, व
ओळंबा या बांधकामातील महत्वाच्या मापन पद्धतीं वापरल्याने अधिक माहिती मिळाली व
अनुभव वाढला.
- 4. बांधकामातील विविध bonds ची
माहिती मिळाली.
छायाचित्रे :