केक बनवणे -
साहित्य :
अ.क्र.
|
साहित्य
|
प्रमाण
|
1
|
मैदा
|
२०० ग्रॅम
|
2
|
पिठी साखर
|
१०० ग्रॅम
|
3
|
बटर
|
८० ग्रॅम
|
4
|
बेकिंग पावडर
|
अर्धा चमचा
|
5
|
बेकिंग सोडा
|
१ चमचा
|
6
|
मलई
|
२०० ग्रॅम
|
7
|
दुध
|
१ कप
|
8
|
काजू, बदाम व मनुके
|
१० ग्रॅम (एकत्रित)
|
कृती : वरील सर्व साहित्य
मैद्यामध्ये टाकून त्याचे मिश्रण तयार करून घेतले. मिश्रण पूर्णपणे एकसारखे करून
घेतले. त्यानंतर ते मिश्रण फेटून (हलवून) घेतले. ही प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर कुकर
मध्ये दोन ते तीन कप मीठ घातले (कुकरच्या तळाला). कुकरमधील डब्याला आतील सर्व
बाजूने डालडा व मैदा लावून घेतला. तयार केलेले मिश्रण त्या डब्यामध्ये घातले. मंद
गॅसवर एक तास केक भाजून घेतला. हे करीत असताना मात्र कुकरची शिट्टी बाजून काढून
ठेवली होती. केक भाजून तयार झालेनंतर काजू, बदाम, व मनुके यांचा वापर करून केकची
सजावट केली.
No comments:
Post a Comment