Wednesday 8 March 2017

विभाग :- उर्जा व पर्यावरण : प्रकल्पाचे नाव :- किचन एनर्जी ऑडिट

विज्ञान आश्रम, पाबळ.

डिप्लोमा इन बेसिक रुरल टेक्नोलॉजी { डी.बी.आर.टी.}

सन :-२०१६-२०१७

प्रकल्प
विभाग :- उर्जा व पर्यावरण

प्रकल्पाचे नाव :- किचन एनर्जी ऑडिट

विद्यार्थ्याचे नाव :- 1] अर्चना संदीप मोरे .
              2] साईराज दत्तात्रय चोळके.

प्रकल्प सुरु करण्याची दिनांक :- २२/११/२०१६
प्रकल्प समाप्ती दिनांक :-  ०९/१२/२०१६


मार्गदर्शक शिक्षक :- श्री. सुयोग सर.


अनुक्रमणिका

अ.क्र.
शिर्षक
पान.क्र.
१.
प्रस्तावना
२.
उद्देश व नियोजन
३.
साधने कृती
४.
आलेख : लाकूड इंधन वापर
५.
सोलर कुकरवर शिजवलेले अन्नपदार्थ सारणी
६.
अनुभव व निरीक्षणे
७.
छायाचित्रे
९, १०

प्रस्तावना :

पर्यावरणाच्या दृष्टीने पारंपारिक उर्जेचा वापर करण्यापेक्षा अपारंपारिक ऊर्जेमध्ये सौरऊर्जा व बायोगॅसचा जास्तीत जास्त वापर केल्यास पर्यावरणास हानी पोहचणार नाही. लाकूड इंधनाचा वापर केल्यास झाडांची तोड होतेच त्याचबरोबर हे इंधन जाळल्यास त्याच्या धुरापासून शरीरास अनेक धोके संभवतात.  
म्हणून विज्ञान आश्रम किचन मधील किचन एनर्जी ऑडिट करण्याबरोबरच लाकूड इंधनाचा वापर कमी करून सौरऊर्जा व बायोगॅस इंधनाचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल त्याचे नियोजन केले, लाकूड इंधन कमी वापरून सोलरकुकर व बायोगॅसवर अन्नपदार्थ शिजवण्यास सुरवात केली. लाकूड इंधन व अक्षय ऊर्जेवर शिजणाऱ्या पदार्थाच्या नोंदी, त्याचबरोबर इंधन वापर याच्या नोंदी घेण्यास सुरवात केली.

उद्देश : 

किचन एनर्जी ऑडिट करणे, त्याचबरोबर अन्न शिजविण्यासाठी लाकूड इंधनाचा वापर कमी करून सोलर कुकर व बायोगॅस इंधनाचा वापर करणे, वापरलेल्या इंधनाच्या नोंदी घेणे.

नियोजन  : 

  • लाकूड इंधनाचा वापर किती प्रमाणात केला जातो याचे निरीक्षण करणे.
  • लाकूड इंधन वजन करून देणे.
  • चुलीवर तयार केल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांच्या नोंदी ठेवणे.
  • बायोगॅस व सोलर इंधन वापर निरीक्षण व जास्तीत जास्त वापरण्यास उत्तेजन देणे व नोंदी ठेवणे.
  • सोलरकुकरवर कोणते पदार्थ लवकर व कोणते वेळाने शिजतात याच्या नोंदी ठेवणे.
साधने :

बायोगॅस, सोलर कुकर.

कृती :

सुरवातीला लाकूड इंधनाचा वापर किती प्रमाणात केला जातो याचे निरीक्षण केले. नंतर लाकूड वजन करून देण्यास सुरवात केली.
किचन मध्ये शिजवल्या जाणाऱ्या अन्नपदार्थाच्या नोंदी ठेवल्या. लाकूड कमी करण्यासाठी बायोगॅस व सोलर कुकरचा वापर केला. सोलरकुकर वरती कोणत्या भाज्या व इतर अन्नपदार्थ लवकर शिजतात याचे निरीक्षण केले. त्यानुसार अन्नपदार्थ शिजवण्यास सुरवात केली.


सोलर कुकर व बायोगॅस इंधन वापरल्याने लाकूड इंधनचा वापर कमी झाल्याचे खालील आलेखावरून दिसून आले.





आश्रम बायोगॅस व इंधन वापर लिंक : (अधिक माहितीसाठी)



सोलर कुकरवर शिजवलेले अन्नपदार्थ तक्ता :
दिनांक
शिजवण्यास ठेवलेली वेळ
पदार्थ शिजलेली वेळ
पदार्थ
22.11.16
09 : 20
12 : 00
11 : 38
03 : 15
डाळ
भोपळा
23.11.16
09 : 25
12 : 10
11 : 50
03 : 40
डाळ
बटाटा
24.11.16
09 : 30
11 : 20
11 : 45
02 : 05
डाळ
मुग
25.11.16
ढगाळ वातावरण
26.11.16
08 : 55
11 : 50
10 : 40
04 : 00
डाळ
भात 
27.11.16
09 : 10
12 : 15
01 : 15
11 : 45
01 : 10
02 : 00
आळूची पाने
फ्लॉवर
डाळ    
28.11.16
09 : 15
11 : 00
12 : 35
03 : 30
10 : 30
12 : 30
02 : 00
04 : 20
डाळ
वांगी
डाळ
भात         
29.11.16
09 : 00
11 : 35
01 : 00
02 : 45
03 : 30
11 : 30
12 : 50
02 : 45
03 : 20
04 : 40
हि.वाटणा
डाळ
भोपळा
भात
डाळ                   
30.11.16
09 : 05
11 : 00
02 : 15
03 : 30
11 : 00
02 : 00
03 : 15
05 : 00
डाळ
पावटे (काळा)
डाळ                    भात               
01.12.16
08 : 45
01 : 00
02 : 00
11 : 00
02 : 00
03 : 30
हरबरा
डाळ                    भात               

अनुभव व निरीक्षणे :

  • सौरऊर्जेचा व बायोगॅसचा वापर केल्याने लाकूड इंधनाचा वापर कमी झाला.
  • बायोगॅस व सौरऊर्जा हे दोन्ही एकाच वेळी वापरता आल्याने जेवण लकवर तयार होण्यास मदत झाली.
  • सौरऊर्जा व बायोगॅस पासून मिळणाऱ्या इंधनाचा वापर जास्तीत जास्त उन असल्यावरच चांगला होतो अन्यथा नाही.
  • पावसाळ्यात सौरउर्जा व बायोगॅसचा वापर करता येत नाही.
  • सोलरकुकर उपकरण सूर्याच्या किरणांनुसार फिरवावे लागते. 

छायाचित्रे :
  • लाकूड वजन करून देताना 



  • चुलीचा वापर...



  • सोलर उपकरण वापर... 



  • .          जेवण बनवणेसाठी बायोगॅस वापर...







No comments:

Post a Comment