Saturday, 25 February 2017

विभाग : गृह आणि आरोग्य - बेकरी प्रशिक्षण- केक बनवणे

केक बनवणे -

साहित्य :

अ.क्र.
साहित्य
प्रमाण
1
मैदा
२०० ग्रॅम
2
पिठी साखर
१०० ग्रॅम
3
बटर 
८० ग्रॅम
4
बेकिंग पावडर
अर्धा चमचा
5
बेकिंग सोडा
१ चमचा
6
मलई
२०० ग्रॅम
7
दुध
१ कप
8
काजू, बदाम व मनुके
१० ग्रॅम (एकत्रित)


कृती : वरील सर्व साहित्य मैद्यामध्ये टाकून त्याचे मिश्रण तयार करून घेतले. मिश्रण पूर्णपणे एकसारखे करून घेतले. त्यानंतर ते मिश्रण फेटून (हलवून) घेतले. ही प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर कुकर मध्ये दोन ते तीन कप मीठ घातले (कुकरच्या तळाला). कुकरमधील डब्याला आतील सर्व बाजूने डालडा व मैदा लावून घेतला. तयार केलेले मिश्रण त्या डब्यामध्ये घातले. मंद गॅसवर एक तास केक भाजून घेतला. हे करीत असताना मात्र कुकरची शिट्टी बाजून काढून ठेवली होती. केक भाजून तयार झालेनंतर काजू, बदाम, व मनुके यांचा वापर करून केकची सजावट केली. 





विभाग : गृह आणि आरोग्य - बेकरी प्रशिक्षण - नानकेट बनवणे

नानकेट बनवणे -

साहित्य :

अ.क्र.
साहित्य
प्रमाण
1
मैदा
२ किलो
2
पिठी साखर
१ किलो
डालडा
१ किलो
4
वेलची पावडर
१० ग्रॅम
5
तेल
५० ग्रॅम
6
इंधन लाकूड (भट्टी असल्याने)
३ किलो


कृती : सुरवातीला डालडा व पिठी साखर यांचे मिश्रण तयार करून घेतले. मिश्रण पूर्णपणे क्रीमसारखे होईपर्यंत मळून घेतले. ही प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर त्या मिश्रणामध्ये मैदा व वेलची पावडर टाकून मळून घेतले. त्यानंतर दुसऱ्यांदा हे मिश्रण थोडे घट्ट झाल्यानंतर तेल टाकून मळून घेतले. हे मिश्रण एकसारखे होऊन दिले आणि नंतर हाताला मैदा लावून भाकरी सारखे थापटून घेतले. स्वच्छ ट्रेमध्ये आपल्या आवडीप्रमाणे त्याचे आकार तयार करून घेतले. भट्टीमध्ये भाजून घेतले. 









विभाग : गृह आणि आरोग्य - बेकरी प्रशिक्षण- टोस्ट बनवणे

टोस्ट बनवणे -

साहित्य :

अ.क्र.
साहित्य
प्रमाण
1
मैदा
३ किलो
2
साखर
३०० ग्रॅम
3
मीठ
५० ग्रॅम
4
यीस्ट
५० ग्रॅम
5
तेल
१० ग्रॅम
6
जिरे
१० ग्रॅम
7  
पाणी
गरजेनुसार साधारण (1 लिटर)
8
इंधन लाकूड (भट्टी असल्याने)
3 किलो


कृती : सुरवातीला पाण्यामध्ये साखर, मीठ, जिरे व इस्ट टाकले. हे सर्व मिश्रण मैद्यामध्ये टाकून त्याची कणिक बनवून घेतली. कणिक पूर्णपणे रबर सारखी ताणता येईल अशा प्रमाणात तयार केली. स्वच्छ पत्र्याच्या ट्रेला तेल लावून त्यात आयताकृती ब्रेड आकाराचे गोळे तयार करून ठेवले व हलक्या हाताने गोळ्यांवर थोडा दाब दिला. दोन तास ट्रे स्वच्छ कापडाने गुंडाळून ठेवले. दोन तासांनी गोळे फुगल्यानंतर भट्टीत भाजणेस ठेवले. किमान तीन ते चार मिनिटात टोस्ट भट्टीत भाजून घेतले. भट्टीतून टोस्ट भाजून काढलेनंतर तयार झालेली slice कट करून घेतले व पुन्हा उलटी म्हणजेच दुसरी बाजू भाजून घेतली.



विभाग : गृह आणि आरोग्य - बेकरी प्रशिक्षण -पाव बनवणे

पाव बनवणे -

साहित्य :

अ.क्र.
साहित्य
प्रमाण
1
मैदा
४ किलो
2
साखर
१५० ग्रॅम
3
मीठ
६० ग्रॅम
4
यीस्ट
५० ग्रॅम
5
तेल
१५ ग्रॅम
6
पाणी
गरजेनुसार साधारण (1 लिटर)
7
इंधन लाकूड (भट्टी असल्याने)
3 किलो


कृती : सुरवातीला पाण्यामध्ये साखर, मीठ, व इस्ट विरघळून घेतले. त्यामध्ये मैद्याचा वापर करून त्याची कणिक बनवून घेतली. कणिक पूर्णपणे रबर सारखी ताणता येईल अशा प्रमाणात तयार केली. स्वच्छ पत्र्याच्या ट्रेला तेल लावून त्यात अंडाकृती गोळे तयार करून ठेवले व हलक्या हाताने गोळ्यांवर थोडा दाब दिला. दोन तास ट्रे स्वच्छ कापडाने गुंडाळून ठेवले. दोन तासांनी गोळे फुगल्यानंतर भट्टीत भाजणेस ठेवले. किमान तीन ते चार मिनिटात पाव भट्टीत भाजून घेणे. भट्टीतून पाव भाजून काढलेनंतर वरून ब्रशने तेल लावून घेतले.