Monday 28 November 2016

विभाग – गृह आणि आरोग्य : खिचडी भात

प्रात्यक्षिक : खिचडी भात
साहित्य :- तांदूळ, बटाटा, मूगडाळ, तेल, मीठ, जिरे, लिंबू, पाणी, टॉमेटो, फ्लॉवर, कोंथिबीर, लसूण, आले, कांदा व शेंगदाणे.
कृती :- सर्व साहीत्य बाजारातून आणले.बटाटा, फ्लॉवर, टॉमेटो,स्वच्छ धुवून घेतले.त्यानंतर तांदूळ नीट करुन घेतले व धुतले. टॉमेटो, `फ्लॉवर, कांदा, कोंथिबीर, लसूण, आले हे सर्व चिरून घेतले. कोंथिबीर, लसूण, आले हे सर्व मिक्सर मधून बारीक करून घेतले.

  पातेलमध्ये तेल घालून गरम केले. जिरे व  कांदा टाकून भाजून घेवून बारीक केलेला मसाला टाकला. त्या मसाल्या मध्ये तांदूळ, शेंगदाणे आणि मूगडाळ  टाकून भाजून घेतले. टॉमेटो व फ्लॉवर घातला. त्यात मीठ व पाणी घालून अर्धा तास मंद गॅसवर शिजत ठेवला. खिचडी भात तयार झाल्यावर त्या वरती कोंथिबीर  व लिंबू ठेवून सजावट केली.

No comments:

Post a Comment