Thursday, 10 November 2016

विभाग : शेती –पशुपालन : प्रकल्प हायड्रोपोनिक्स ( माती विना हिरवा चारा )

विज्ञान आश्रम पाबळ

विभागाचे नाव
:
शेती व पशुपालन
प्रकल्पाचे नाव
:
हायड्रोपोनिक्स पद्धतीने हिरवा चारा निर्मिती
विद्यार्थ्याचे नाव
:
अर्चना संदीप मोरे
मार्गदर्शन
:
दादासो पाटोळे सर
प्रकल्प सुरु केल्याची दिनांक :-
:
10.08.2016
प्रकल्प संपण्याची दिनांक
:
18.10.2016

  

अनुक्रमणिका


अ.क्र.
शिर्षक
पान.क्र.
१.
प्रस्तावना
२.
उद्देश व नियोजन
३.
साहित्य व साधने
४.
कृती  
५.
नोंदी  
६.
प्रवाह आकृती आलेख
७.
चारा निर्मितीसाठी आलेला खर्च व उत्पन्न
८.
छायाचित्रे
१०
९.
छायाचित्रे
११
१०.
अनुभव, अनुमान व निरीक्षणे
१२
११.
संदर्भसूची व सूचना
१३



प्रस्तावना :-
दिवसेंदिवस शहरीकरण वाढत असल्याने शेतीचे प्रमाण कमी होत आहे. शेत जमिनीच्या किमती भरमसाठ वाढत आहेत. पावसाचीही अनियामातीता वाढत आहे, त्यामुळे सर्वसामान्य शेतकर्यांना आपल्या जनावरांना जास्तीत जास्त चारा उपलब्ध करण्यास अडचणी येत आहेत. त्यावर एक चांगला सर्वांनाच परवडणारा ‘हायड्रोपोनिक्स’  माती विना शेती हा कमी जागेत राबवला जाणारा प्रकल्प फायदेशीर आहे.  यामध्ये आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या पाण्याचा वापर करून चाऱ्याची निमिती केली जाते. आपण कोणत्याही मोसमात हा प्रकल्प उभारून हिरवा चारा तयार करू शक्यतो. पाण्याचा वापर जास्त होतो. हायड्रोपोनिक्स मध्ये नोंदी ठेवणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे आपल्याला किती दिवसात किती चारा वाढला व किती उत्पन्न मिळते हे समजते.



उद्देश व नियोजन :

उद्देश :
कमी जागेत व कमी वेळेत हिरवा चारा तयार करणे.

नियोजन :-
अगोदरपासूनच विज्ञान आश्रमामध्ये हायड्रोपोनिक्ससाठी शेडची सुविधा असल्याने आम्हाला फक्त त्याची दुरुस्ती करावी लागली. त्यामध्ये ट्रे खराब झाले होते ते नवीन आणले. फॉगर सिस्टम दुरुस्त केली. नेट फाटले होते ते व्यवस्थित शिवून घेतले. मका विकत आणला.


 साहित्य :
1.    ट्रे (प्लास्टिक चौकोनी किवा आयताकृती)   
2.    मोटर
3.    फॉगर सिस्टम
4.    बियाणे
5.    पाणी इ.

साधने :

1.    कटर
2.    दोरी
3.    पक्कड
4.    होतोडी
5.    हेक्सा
6.    टेस्टर
7.    ड्रील मशीन




कृती :- 
प्रथम बाजारातून बियाणे खरेदी केले. मका निवडून घेतला. व वजन करून तो मका मिठाच्या पाण्यात दहा मिनिटे ठेवला. दहा मिनिटांनी दुसऱ्या पाण्यानी स्वच्छ धुवून घेतला. त्यानतंर कोमट पाण्यामध्ये मका २४ तास भिजत ठेवला. २४ तास झाल्यानतंर पुन्हा वजन करून घेतले. ओल्या पोत्यामध्ये वजन करून घेतलेला मका २४ तास बांधून ठेवला. त्याला कोंब आल्या नतंर प्रत्येक ट्रे मध्ये वजन करून पसरून ठेवला. व रोज एक तासांनी दोन मिनिटांचे फवारे फोगर सिस्टमनी आठ दिवस मारले. दिवसाला किती वाढ होते याच्या नोंदी ठेवल्या.


नोंदी :
१)    मका पाण्यात टाकण्याअगोदर मक्याचे वजन करून घेतले. मका पाण्यात ठेवल्यानतंर मक्याचे वजन किती वाढले. कोमट पाण्यातून काढल्यावर वजन किती वाढले.
२)    मका पोत्यामध्ये ठेवण्याअगोदर त्याचे वजन केले. व त्यानतंर मक्याला कोंब आल्यानंतर पुन्हा वजन केले.
३)    कोंब आलेला मका ट्रे मध्ये वजन करून पसरून ठेवला.
४) ट्रे मध्ये ठेवल्यानतंर त्याचे रोज किती वजन वाढते व उंची किती वाढते याच्या नोंदी ठेवल्या.


प्रवाह आकृती :


बियाणे स्वच्छ पाण्यात धुवून काढणे.


बियाणे रात्रभर कोमट पाण्यात भिजत ठेवणे.


बियाणे सुती ओल्या कापडात 24 तास बांधून ठेवणे.


बियाणे वापरासाठीचे ट्रे निर्जंतुक करून घेणे.


बियाणे ट्रे मध्ये टाकणे.


पाणी वेळेवर देणे व तापमान, आद्रता नियंत्रित ठेवणे.


सात दिवस निरीक्षण करणे.


सातव्या दिवशी 1 किलोग्राम बियानामध्ये ७ किलो हिरवा चारा तयार झाला कि नाही व चाऱ्याची उंची ७ इंच झाली की नाही याच्या नोंदी घेणे.

चारा निर्मितीसाठी आलेला खर्च व उत्पन्न :
प्रत्यक्ष प्रकल्पावर काम करून खालील सारणी प्रमाणे हिरवा चारा तयार केला.

भिजत ठेवलेला एकूण मका (किलोग्रॅम)
दर प्रति किलो
एकूण
तयार हिरवा चारा (किलोग्रॅम)
खराब चारा
(किलोग्रॅम)
49
22
1078
63
5


छायाचित्रे :

1.    मक्याच्या बियाणास अंकुर फुटल्यानंतर

1.    हायड्रोपोनिक्स पद्धतीने तयार होताना हिरवा चारा


  जनावरांना देणेसाठी हायड्रोपोनिक्स तयार झालेला हिरवा चारा
 






अनुभव :

1.    पाणी वेळेवर न दिल्यास पिकांची वाढ कमी दिसून आली.
2.    हायड्रोपोनिक्स शेड मध्ये कमी तापमान असणे गरजेचे आहे.
3.    फोगर्स सिस्टम व्यवस्थित न चालल्यास अथवा एकाच ठिकाणी जास्त पाणी पडल्यास बुरशी लागते.
4.    ट्रे निर्जंतुक न केल्यास बुरशी येऊ शकते.

अनुमान :

1.    हायड्रोपोनिक्सचे योग्य नियोजन करून चारा निर्मती केल्यास चांगले उत्पन्न मिळते.
2.    या तंत्राचा वापर करून चारा निर्मितीचा व्यवसाय करू शकतो.
3.    सकस असा चारा दिल्याने दुध उत्पादनात वाढ होतेच त्याचबरोबर फॅटही वाढते.

निरीक्षणे :

1.    पाणी देण्याच्या वेळेत बदल झाल्यास पीक वाढीस फरक पडतो.
2.    हायड्रोपोनिक्सच्या मदतीने कमी जागेत आपण दुध व्यवसाय करू शकतो.
3.    सायकल पद्धतीने आपणास उत्पादन हवे असल्यास रोज ठरलेल्या वेळेत बियाणे पाण्यात भिजत ठेवावीत.
4.    पिकांच्या मुळाना बुरशी लागू नये यासाठी काळजी घेणे.

संदर्भ सूची :
1.    इंटरनेट वरून माहिती घेतली.


सूचना :
1.    बियाणे विकत घेत असताना बियास कीड लागलेली नाही ना अथवा खराब आहेत का हे तपासून घेणे.
2.    जरी बियाणे तपासून खरेदी करून आणली तरी स्वच्छ निवडून घ्यावीत.
3.    फोगर सिस्टम मध्ये मोटर 1 तासानंतर २ मिनिटे चालू झालीच पाहिजे.







No comments:

Post a Comment