साहित्य : - बेसनपीठ, सोडा, लालतिखट, मीठ, शेंगदाणे.
साहित्याचे प्रमाण :- बेसनपीठ २ वाटी, सोडा अर्धा चमचा, लालतिखट २ चमचे,
शेंगदाणे ३ वाट्या, मीठ चवीनुसार
साधने : - कढई, झारा, शेगडी.
कृती : - बेसनपीठामध्ये मीठ व सोडा टाकून एकत्र करून घेतले. त्यात पाणी घालून
ते सर्व फेटून घेतले. थोडे पीठ पातळ केले. नंतर कढईत तेल तळण्यासाठी घेतले. तेल कढल्यानंतर बेसनपीठ झाऱ्यावर टाकून हलकासा झारा हलवून बुंदी सारखी कळी
पाडून ती तळून घेतली.
फोडणी : - कढीपत्ता व शेंगदाणे कढईमध्ये एक चमच्या तेल घालून चांगले भाजून
घ्यावे. त्यात लालतिखट टाकून एकत्रित हलवावे. नतंर खारीबुंदी घालून हलवून घेतले.
आमची खारीबुंदी तयार झाली.
No comments:
Post a Comment