महत्व :-हिरवा चारा याचे उत्पाद्न कमी दिवसामध्ये व कमी जागेत
व कमी पाण्यात होऊ शेकते. तसेच दुष्काळ भागात व उन्हाळीमध्ये हिरवा चारा होतो.
हायड्रोपोनिक्स मुळे जनावरांच्यावर येणारा खर्च कमी होतो. जनावरांच्या रोजच्या दुधात वाढ होऊ शेकते.
तयार करण्याची पद्धती :-प्लास्टिक ट्रे असावेत.
पहिला मका नीट करून घ्यावा मीठाच्या पाण्यामघ्ये
१० मिनिट भिजत ठेवून नंतर चांगल्या पाण्यात मका १२ तास भिजत ठेवावा. दोन दिवसांनी मोड आलेले असतात.
त्यावेळी ट्रे स्वच्छ धुवून घ्यावेत. ५०० ते ७०० ग्रॅम मका वजन करून ट्रे मध्ये घालावा. त्यानंतर बरोबर
ठिबक सिंचनच्या खाली ट्रे ठेवावेत.
चारा तयार होण्याचा
कालावधी :- १५ ते २० दिवसात चारा जनावरांना देऊ शकतो. २ ते ३ ट्रे जनावरांना रोज
मिळाले पाहिजेत. त्यामुळे जनावरांच्या दुधात वाढ होते.अर्धा ते दोन लिटर मध्ये तसेच दुधामध्ये फॅट चांगला बसतो .