विज्ञान आश्रम, पाबळ.
डिप्लोमा इन बेसिक रुरल टेक्नोलॉजी { डी.बी.आर.टी.}
सन :-२०१६-२०१७
प्रकल्प
विभाग :- गृह आणि आरोग्य
प्रकल्पाचे नाव :- दशम्या
विद्यार्थ्याचे नाव :- 1] अर्चना संदीप मोरे .
2] अक्षय काजरेकर.
मार्गदर्शक शिक्षक :- रेश्मा मॅडम व सचिन सर
अनुक्रमणिका
अ.क्र.
|
शिर्षक
|
पान.क्र.
|
१.
|
प्रस्तावना
|
३
|
२.
|
उद्देश व नियोजन
|
४
|
३.
|
साहित्य व साधने
|
५
|
४.
|
कृती
|
६
|
५.
|
प्रवाह आकृती
|
७
|
६.
|
प्रत्यक्ष खर्च
|
८
|
७.
|
अनुभव व निरीक्षणे
|
९
|
८.
|
छायाचित्रे
|
१०,११ व १२
|
प्रस्तवना : -
पदार्थ बनविण्यास शिकण्याबरोबरच वरील
उद्देशाप्रमाणे असा उपयुक्त पदार्थ बनवून एक घरगुती व्यवसाय बनेल असा प्रयत्न करून
खमंग पदार्थ बनविला. काही लोक प्रवासामध्ये बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळतात,
त्यांच्यासाठी तर हा पदार्थ फारच उपयोगी आहे. किमान पंधरा दिवस तरी हा पदार्थ खराब
होत नाही.
उद्देश : -
जास्त काळ टिकाऊ, चविष्ट, पोष्टिक व
प्रवासामध्ये उपयोगी असा खाद्यपदार्थ बनवणे.
नियोजन : -
सुरुवातीला आम्ही कोणता पदार्थ जास्त काळ टिकाऊ,
चविष्ट आणि त्याचबरोबर पोष्टींक बनवता येईल याचा विचार केला. ‘दशम्या’ पदार्थ बनविण्याचे
ठरविले. त्यासाठी लागणाऱ्या साहित्य- साधनाची यादी तयार केली. लागणारे साहित्य
बाजारातून खरेदी केले.
साहित्य : -
बेसन पीठ, रवा, मैदा, ओवा, तीळ, लाल तिखट, सोडा, मीठ, तेल, पाणी. इ.
साधने : -
गॅस, कढई, झारा, पळपुठ-लाटणे, भांडे, परात, पक्कड, लहान वाटी (गोल आकार
बनविण्यासाठी) इ.
कृती : -
प्रथम आम्ही लागणारे साहित्य व साधने एकत्रित
केली. त्यानंतर रवा, मैदा, बेसन पीठ, हे
सर्व चाळून घेतले. एकत्रित मिश्रण केले. त्यात दोन चमचे तेल गरम करून घातले. त्या
मिश्रणामध्ये ओवा, तीळ, लाल तिखट, सोडा, मीठ. घालून मिक्स केले. व पाणी घालून मळून
घेतले. पोळ्या प्रमाणे लाटून घेवून लहान आकाराच्या वाटीने पुऱ्यासारखे आकार कट
करून घेतले आणि शेवटी तळून घेतले.
प्रवाह आकृती : -
रवा, मैदा, बेसन पीठ चाळून
घेणे.
गरमतेल, लाल तिखट, ओवा,
तीळ, सोडा, मीठ यांचे मिश्रण.
पाणी घालून मळून घेणे.
पोळ्या सारखे लाटून घेणे.
वाटीच्या सहाय्याने पुरी
सारखे आकार काढून तळून घेणे.
दशम्या थंड झाल्यावर पॅकिंग
करणे.
दशम्या बनविनेसाठी आलेला प्रत्यक्ष खर्च :
अ.
क्र.
|
साहित्याचे नांव
|
वजन
|
किमत
|
1
|
बेसन पीठ
|
२५० ग्रॅम
|
१५
|
2
|
मैदा
|
२५० ग्रॅम
|
१०
|
3
|
रवा
|
२० ग्रॅम
|
०५
|
4
|
ओवा
|
१ ग्रॅम
|
०२
|
5
|
तीळ
|
५ ग्रॅम
|
०५
|
6
|
लाल तिखट
|
३ ग्रॅम
|
०३
|
7
|
सोडा
|
१ ग्रॅम
|
०१
|
8
|
तेल
|
३५० ग्रॅम
|
२०
|
9
|
इंधन गॅस
|
|
१०
|
10
|
मीठ
|
चवीनुसार
|
|
|
एकूण रुपये
|
|
७१
|
अनुभव व निरीक्षणे : -
१) मिश्रणामध्ये पाणी जास्त झाल्यास मिश्रण पातळ होते.
२) मसाला कमी-जास्त झाल्यास चवीमध्ये बद्ल होतो.
३) तेल गरम होण्याच्या अगोदर दशम्या कढईमध्ये टाकल्या तर कढईला चिकटून बसतात.
४) जास्त दिवस टिकणारे खाद्यपदार्थ म्हणून आपण विक्री करू शकतो.
५) बऱ्याच वेळ लाटून ठेवलेल्या दशम्या फुगत नाहीत व चवीमध्ये फरक पडतो.
६) दशम्या गरम असतानाच
पॅकिंग केल्याने पिशवीच्या आतमध्ये पाणी सुटते.