Thursday, 29 December 2016
Sunday, 4 December 2016
विभाग : ऊर्जा व पर्यावरण : सोलर कुकरचा वापर करून अन्नपदार्थ शिजवणे.
सुरवातीला आम्ही सोलर कुकरचा वापर करून
अन्नपदार्थ कशा प्रकारे शिजवले जातात आणि त्याचबरोबर इतर इंधनाचा वापर न करता या
नैसर्गिक इंधनाचा वापर करून अन्नपदार्थ सुलभरीतीने शिजवता येतात याची माहिती
घेतली, याचे फायदे- तोटे जाणून घेतले आणि प्रत्यक्षात सोलर कुकरवर भात शिजवला.
खालील तक्त्या प्रमाणे दर एका तासांनी तापमानाच्या रीडिंगस घेतल्या.
|
वेळ
|
सोलर कुकर मधील तापमान
|
बाहेरील तापमान
|
|
11 : 18
|
-
|
330C
|
|
12 : 20
|
600C
|
380C
|
|
01 : 20
|
640C
|
-
|
|
02 : 25
|
690C
|
400C
|
|
03 : 20
|
720C
|
360C
|
Monday, 28 November 2016
विभाग – गृह आणि आरोग्य : खिचडी भात
प्रात्यक्षिक : खिचडी भात
साहित्य :- तांदूळ, बटाटा, मूगडाळ, तेल,
मीठ, जिरे, लिंबू, पाणी, टॉमेटो, फ्लॉवर, कोंथिबीर, लसूण, आले, कांदा व शेंगदाणे.
कृती :- सर्व साहीत्य बाजारातून
आणले.बटाटा, फ्लॉवर, टॉमेटो,स्वच्छ धुवून घेतले.त्यानंतर तांदूळ नीट करुन घेतले व
धुतले. टॉमेटो, `फ्लॉवर, कांदा, कोंथिबीर, लसूण, आले हे सर्व चिरून घेतले.
कोंथिबीर, लसूण, आले हे सर्व मिक्सर मधून बारीक करून घेतले.
पातेलमध्ये
तेल घालून गरम केले. जिरे व कांदा टाकून
भाजून घेवून बारीक केलेला मसाला टाकला. त्या मसाल्या मध्ये तांदूळ, शेंगदाणे आणि
मूगडाळ टाकून भाजून घेतले. टॉमेटो व
फ्लॉवर घातला. त्यात मीठ व पाणी घालून अर्धा तास मंद गॅसवर शिजत ठेवला. खिचडी भात
तयार झाल्यावर त्या वरती कोंथिबीर व लिंबू
ठेवून सजावट केली.
विभाग – गृह आणि आरोग्य : हिमोग्लोबिनचे प्रमाण मोजणे.
साहित्य : - टेस्टट्यूब,
कॅम्पॅरेटर, ड्रॉपर, ब्रश, लॅन्सेट, पिपेट, HCL, DW, कापूस, स्पिरीट, शरीरातील रक्त.
१) टेस्टट्यूबमध्ये वीसच्या
खुनेपर्यंत HCL घेतले.
२) बोटाचे रक्त घ्यायचे आहे
तेथील जागा स्पिरीटच्या साहाय्याने
स्वच्छ करून घेतले.
३) लॅसेटच्या साहाय्याने बोटाला टोचून रक्त काढले.
४) ०.२ ml एवढे पिपेटमध्ये
रक्त घेतले.
५) रक्त परीक्षानळीत सोडले.
६) परीक्षानळी ही कॅम्पेरेटरमध्ये दहा मिनिटे ठेवली.
७) कॅम्पेरेटरच्या दोन्ही बाजूच्या रंगाशी जुळत नाही तो पर्यंत त्यामध्ये dw चे द्रावण घातले.
या प्रकारे हिमोग्लोबिन चेक करण्यास शिकले.
विभाग – गृह आणि आरोग्य : रक्तगट तपासणे व माहिती घेणे.
साहित्य :- लँसेट, कापूस, काचपट्या (स्लाईड्स), स्पिरीट, Anti A, Anti B,
Anti D. इ.
कृती :- प्रथमता: आम्ही रक्तगट म्हणजे काय व तो
कसा चेक करावयाचा हे समजून घेतले. आणि आमच्या सेक्शन मधीलच मुलांचे रक्तगट चेक
केले. रक्तगट बरोबर असल्याची खात्री सरांकडून करून घेतली.
प्रात्यक्षिकामधील कृती : आपल्याला ज्या
व्यक्तीचा रक्तगट चेक करावयाचा आहे त्याच्या डाव्या हाताच्या करंगळी शेजारील
बोटाचे रक्त घ्यायचे. त्याअगोदर ती जागा स्पिरीटने स्वच्छ निर्जंतुक करावी. बोटावर
लँसेटनी टोचून रक्त काढावे. ते रक्त काचपट्टीवर तीन (3 drops) ठिकाणी घ्यायचे. त्याचबरोबर Anti A, Anti B,
Anti D. या बॉटलमधील अँटीसिरा त्या
काचपटीच्या घेतलेल्या रक्तावर एकेक थेंब टाकणे. अँटीसिराचे थेंब टाकल्यावर थोडावेळ
थांबणे. त्यानंतर पट्टी हळू हळू हलवणे, अँटीसिरा व रक्त मिसळण्यासाठी. खालील
निरीक्षण अनुमान नुसार रक्तगट ओळखता येतो.
आम्ही आमच्या सोयीसाठी विसरू नये म्हणून
काचेच्या स्लाईड एवढी कागदाची पट्टी तयार करून त्यावर Anti A, Anti B,
Anti D असे लिहून मग
त्याच्यावर काचेची पट्टी ठेवली होती मग त्यावर अँटीसिराचे (Anti A, Anti B,
Anti D) drops सोडले होते.
|
निरीक्षण
|
अनुमान
|
|
फक्त अँटीसिरा A व
D टाकलेल्या ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या व अँटीसिरा B टाकलेल्या ठिकाणी गुठळ्या
तयार झाल्या नाही तर
|
रक्तगट A (+) ve
|
|
फक्त A अँटीसिरा
मध्ये गुठळ्या तयार झाल्या तर
|
रक्तगट A (-) ve
|
|
फक्त अँटीसिरा B व
D टाकलेल्या ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या व अँटीसिरा A टाकलेल्या ठिकाणी गुठळ्या
तयार झाल्या नाही तर
|
रक्तगट B (+)
ve
|
|
फक्त B अँटीसिरा
मध्ये गुठळ्या तयार झाल्या तर
|
रक्तगट B (-)
ve
|
|
अँटीसिरा A,B व D
टाकलेल्या तिन्ही ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या तर
|
रक्तगट AB (+)
ve
|
|
फक्त A व B अँटीसिरा
मध्ये गुठळ्या तयार झाल्या तर
|
रक्तगट AB (-)
ve
|
|
फक्त अँटीसिरा A व
B टाकलेल्या दोन्ही ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या नाहीत व D मध्ये गुठळ्या तयार
झाल्या तर
|
रक्तगट O (+) ve
|
|
अँटीसिरा A,B व D
टाकलेल्या तिन्ही ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या नाहीत तर
|
रक्तगट O (-) ve
|
Subscribe to:
Posts (Atom)









