Saturday, 25 February 2017

विभाग : गृह आणि आरोग्य - बेकरी प्रशिक्षण - नानकेट बनवणे

नानकेट बनवणे -

साहित्य :

अ.क्र.
साहित्य
प्रमाण
1
मैदा
२ किलो
2
पिठी साखर
१ किलो
डालडा
१ किलो
4
वेलची पावडर
१० ग्रॅम
5
तेल
५० ग्रॅम
6
इंधन लाकूड (भट्टी असल्याने)
३ किलो


कृती : सुरवातीला डालडा व पिठी साखर यांचे मिश्रण तयार करून घेतले. मिश्रण पूर्णपणे क्रीमसारखे होईपर्यंत मळून घेतले. ही प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर त्या मिश्रणामध्ये मैदा व वेलची पावडर टाकून मळून घेतले. त्यानंतर दुसऱ्यांदा हे मिश्रण थोडे घट्ट झाल्यानंतर तेल टाकून मळून घेतले. हे मिश्रण एकसारखे होऊन दिले आणि नंतर हाताला मैदा लावून भाकरी सारखे थापटून घेतले. स्वच्छ ट्रेमध्ये आपल्या आवडीप्रमाणे त्याचे आकार तयार करून घेतले. भट्टीमध्ये भाजून घेतले. 









विभाग : गृह आणि आरोग्य - बेकरी प्रशिक्षण- टोस्ट बनवणे

टोस्ट बनवणे -

साहित्य :

अ.क्र.
साहित्य
प्रमाण
1
मैदा
३ किलो
2
साखर
३०० ग्रॅम
3
मीठ
५० ग्रॅम
4
यीस्ट
५० ग्रॅम
5
तेल
१० ग्रॅम
6
जिरे
१० ग्रॅम
7  
पाणी
गरजेनुसार साधारण (1 लिटर)
8
इंधन लाकूड (भट्टी असल्याने)
3 किलो


कृती : सुरवातीला पाण्यामध्ये साखर, मीठ, जिरे व इस्ट टाकले. हे सर्व मिश्रण मैद्यामध्ये टाकून त्याची कणिक बनवून घेतली. कणिक पूर्णपणे रबर सारखी ताणता येईल अशा प्रमाणात तयार केली. स्वच्छ पत्र्याच्या ट्रेला तेल लावून त्यात आयताकृती ब्रेड आकाराचे गोळे तयार करून ठेवले व हलक्या हाताने गोळ्यांवर थोडा दाब दिला. दोन तास ट्रे स्वच्छ कापडाने गुंडाळून ठेवले. दोन तासांनी गोळे फुगल्यानंतर भट्टीत भाजणेस ठेवले. किमान तीन ते चार मिनिटात टोस्ट भट्टीत भाजून घेतले. भट्टीतून टोस्ट भाजून काढलेनंतर तयार झालेली slice कट करून घेतले व पुन्हा उलटी म्हणजेच दुसरी बाजू भाजून घेतली.



विभाग : गृह आणि आरोग्य - बेकरी प्रशिक्षण -पाव बनवणे

पाव बनवणे -

साहित्य :

अ.क्र.
साहित्य
प्रमाण
1
मैदा
४ किलो
2
साखर
१५० ग्रॅम
3
मीठ
६० ग्रॅम
4
यीस्ट
५० ग्रॅम
5
तेल
१५ ग्रॅम
6
पाणी
गरजेनुसार साधारण (1 लिटर)
7
इंधन लाकूड (भट्टी असल्याने)
3 किलो


कृती : सुरवातीला पाण्यामध्ये साखर, मीठ, व इस्ट विरघळून घेतले. त्यामध्ये मैद्याचा वापर करून त्याची कणिक बनवून घेतली. कणिक पूर्णपणे रबर सारखी ताणता येईल अशा प्रमाणात तयार केली. स्वच्छ पत्र्याच्या ट्रेला तेल लावून त्यात अंडाकृती गोळे तयार करून ठेवले व हलक्या हाताने गोळ्यांवर थोडा दाब दिला. दोन तास ट्रे स्वच्छ कापडाने गुंडाळून ठेवले. दोन तासांनी गोळे फुगल्यानंतर भट्टीत भाजणेस ठेवले. किमान तीन ते चार मिनिटात पाव भट्टीत भाजून घेणे. भट्टीतून पाव भाजून काढलेनंतर वरून ब्रशने तेल लावून घेतले.








विभाग : ऊर्जा व पर्यावरण : Practice Task- FAN

टाकाऊ प्लास्टिक बॉटल पासून फॅन बनवला. यामध्ये मोटर, स्वीच, बॅटरी व 10 k व्हेरिएबल रजिस्टर यांची कार्ये (कनेक्शन्स) समजून घेतली. फॅनसाठी लेजर कटरवर एक platform तयार करून घेतला.
साहित्य :

Sr. No.
Material Name
Quantity
1.
Battery -9 V
1
2.
Motor DC (toys)- 5V
1
3.
Variable Register (POT) -10K
1
4.
Switch – 1 amp
1
5.
Wire for connection

6.
MDF sheet for box









विभाग : उर्जा व पर्यावरण - मोटर रिवायडिंग

मोटर रिवायडिंग ( सिंगल फेज )  

१)       सिरीजमध्ये टेस्ट lamp च्या साहाय्याने मोटर चेक केली.
२)       मोटरमधील coil कशा पद्धतीने भरल्या आहेत. ते पहिले.
३)       Coil काढून टन मोजला. वायरिंगचा गेज मोजला.        
४)       Running मध्ये गेज २३ होते. Starting मध्ये गेज २४ होते.     
५)       स्टेटरमध्ये PVC पेपर घातला.
६)        Coil बनवून घेवून त्या बसवून घेतल्या.
७)       Coil ला Shape देवून coil वरती वॉरनिश टाकून ते सुकण्यासाठी बल्ब एक तास सुरु ठेवला.
८)       पुढच्या बाजूला R= R    S=S जोडले. पॉवर कनेक्शनच्या केबल जोडल्या.  

आमच्याकडून झालेल्या चुका : -

१) PVC पेपर फोल्ड करून घातला नव्हता.  
२) खिळ्यांचा वापर केल्यामुळे Coil ला Shape देता आला नाही.
३) PVC पेपर मधून दोन Coil वायर व्यवस्थित बसल्या नव्हत्या.
४) कनेक्शन चुकीचे जोडल्यामुळे Fan उलट्या दिशेने फिरत होता.

Motor Data


Make
Laxmi
Phase
Single phase
Current A
3.5 amps.
K.W.
0.370
H.P.
0.5
R.P.M.
2880
Head
15-25 meter
Capacitor
10 fmd/440 watt
Gauge
5.24 R -23